gold silver 
अर्थविश्व

सोने चांदीच्या दरात मोठे बदल, जाणून घ्या आजचे भाव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 239 रुपयांनी तर 1 किलोग्रॅम चांदीच्या दरात 845 रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातील सोने आणि चांदीचे दर घसरले होते. मंगळवारी दिल्लीत सोन्याचे दर 10 ग्रॅमला 48 हजार 931 रुपये इतके होते. तर चांदीही 49 हजार 548 इतकी होती. 

सोने 49 हजारांवर
गुरुवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली होती. 10 ग्रॅम सोन्याचे दर 293 रुपयांनी कमी झाल्यानंतर सोन्याचा दर 49 हजार 72 रुपये झाला होता. त्याआधी बुधवारी सोन्याचा भाव 49 हजार 365 इतका होता. किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे दर 48 हजार 819 रुपयांवरून 49 हजार 58 रुपयांवर पोहोचला. 

चांंदीच्या दरात 845 रुपयांची वाढ
चांदीच्या दरातही शुक्रवारी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफ बाजारात एक किलो चांदीचे दर तब्बल 845 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे एक किलो चांदीचा दर 48 हजार 455 वरून 49 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमती 17.81 डॉलर प्रति औंस झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सोमवारी एका महिन्यातील उच्चांकी किमतीवर पोहोचली होती. मंगळवारीही यामध्ये भाव वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात यावर्षी सोन्याच्या किंमती जवळपास 16 टक्के वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात साडेसात वर्षांतील उच्चांक मोडला होता.

एमसीएक्सवर सोन्याच्या ऑगस्ट महिन्यातील किंमतीतही घट होऊन ती 47881 झाली होती. यातील 14059 च्या लॉटचा व्यवहार झाला. सोन्याच्या ऑक्टोंबर महिन्यातील किंमतीतही तेवढीच घसरण झाल्याने 10 ग्रॅमचे दर 48028 इतके होते. यातील 5742 लॉटचे व्यवहार झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT